मालवण | प्रतिनिधी : मालवणचा सुपुत्र यश मिलिंद कदम याने नीट परीक्षेत ऑल इंडिया रँक 1823 प्राप्त केली. यश कदम याचे यश अभिमानास्पद असे आहे. असे सांगत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, मोहन वराडकर यांनी यश कदम याचा सन्मान करतं कौतुकाची थाप देत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
कुमार यश मिलिंद कदम याने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टोपीवाला हायस्कूल मालवण येथे पूर्ण केले असून, उच्च माध्यमिक शिक्षण सांगली येथील क्लिअर कन्सेप्ट अकॅडमी मध्ये झाले. बारावी मध्ये 86 टक्के गुण संपादन केले व
नीट परीक्षेत ऑल इंडिया रँक 1823 प्राप्त केली. या घवघवीत यशाबद्दल त्याचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी यश याचे वडील मिलिंद कदम, आई मानसी कदम, आजी सुलोचना कदम, आजोबा अनिल कदम, आजी अनुपमा कदम, काका अभय कदम आदी उपस्थित होते.












