दापोली (प्रतिनिधी) –
दापोली तालुक्यातील शिरसोली येथील ग्रामदैवत श्री शंकर-पार्वती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १८ जून २०२५ रोजी सकाळी १० ते १९ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली.
चोरट्याने मंदिराच्या दर्शनी दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गाभारा आणि मंदिर हॉलमधील मोलाची पूजावस्तू लंपास करण्यात आल्या.
चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये –
चार पिवळ्या धातूच्या लहान-मोठ्या घंटा (किंमत अंदाजे ₹२०,०००)
साडेतीन फूट उंचीच्या दोन पितळी समया (₹१०,०००)
तांब्याचे दोन कलश,
तांब्याचे ताम्हण,
पितळी आरतीचे ताट (₹५००)
एकूण अंदाजे ₹३२,५०० किमतीचे पूजासाहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे.
तक्रारदार –
सुरेश विष्णू जाधव (वय ६७, रा. शिरसोली पश्चिम वाडी, दापोली) यांनी या चोरीची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दिली.
गुन्हा दाखल –
तक्रारीवरून १ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ४:०२ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक तपास करीत आहेत













