दापोलीत बंद घर फोडून सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

दापोली: तालुक्यातील करंजाणी दर्भाचीवाडी येथे एका बंद घराच्या पाठीमागचे उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी १३ मे २०२६ रोजी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत निवृत्त फिर्यादी संतोष श्रीपत साळवी (वय ६३, रा. करंजाणी दर्भाचीवाडी, सध्या रा. कांदिवली, मुंबई) यांनी पोलीस तक्रार दिली आहे. फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा असताना, अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून त्यांच्या मयत आईचे दागिने चोरले. यामध्ये २०,००० रुपये किमतीची अंदाजे ४ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ (नाकातील फुली) आणि १,००,००० रुपये किमतीची अंदाजे ३ तोळ्यांची सोन्याची बोरमाळ, असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ) नुसार गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.