जि.प.प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी येथे शाळेतील मुलांना भाताची रोप काढण प्रात्यक्षिक

गावखडी /वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा मेर्वी
गुरववाडी से.मी.इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना भात ची रोप काढणं व रोपं लावणे बाबतचे प्रत्यक्षित दाखविताना शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष मुढे सर व सोबत सह शिक्षक श्री.मसरत शेख सर तसेच श्रीम. शारदा ताई गुरव व श्रीम.वर्षा ताई गुरव यांनी ही सहभ नोंदविला.अत्यंत आनंदाने सर्व मुलांनी प्रत्यक्षित घेतले शाळेय, शिक्षणाच्या चाकोरी च्या बाहेर जाऊन मुलांना वेगळं काही तरी शिकविण्याची शाळा नेहमी तत्पर असते. त्यासाठी शाळेतील शिक्षक नेहमी उत्साही असतात . मुलांना काही तरी नवीन शिकविण्या साठी धडपड करत असतात.या बाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
फोटो मॅटर मेर्वी गुरववाडी जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना भाताचीरोप काढण व रोप लावणे प्रात्यक्षिक दाखविताना मुख्याध्यापक श्री.संतोष मुडे, शारदा गुरव,वर्षा गुरव