आनंद शिशुवाटिकेमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी!

सावंतवाडी : कळसुलकर इंग्लिश स्कूल संचलित आनंद शिशुवाटिकेमध्ये १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेच्या सर्व मुलांनी आपल्या पालकांचे स्वागत आणि औक्षण करून त्यांची पाद्यपूजा केली.

या सोहळ्याला शिशुवाटिकेच्या शिक्षिका, कर्मचारी वर्ग, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक आणि विद्यार्थ्यांनी मिळून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, ज्यामध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. आनंद शिशुवाटिकेमध्ये गुरुपौर्णिमेचा हा सोहळा यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला.