३४ संरक्षक भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

 मुख्याधिकारी विशाल भोसले यांचे रूमाज कन्सल्टींग ॲण्ड इन्फ्रा कंपनीला आदेश

चिपळूण (प्रतिनिधी) : नगर परिषद हद्दीत मागील ३ वर्षात बांधण्यात आलेल्या व सध्या कामे सुरू असलेल्या ३४ संरक्षक भिंतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, असे आदेश नगर परिषद पॅनलवरील रुमाज कन्सलटींग अॅण्ड इन्फ्रा कंपनीला मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिले आहेत. तसेच याबाबतचा तांत्रिक अभिप्राय सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
पावसामुळे होणाऱ्या भूस्खलनासारख्या घटनांमुळे ही खबरदारी घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील खेंड येथील संरक्षक भिंत कोसळून ९ कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्याधिकारी भोसले यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्वच संरक्षक भिंतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वरील कंपनी शंकरवाडी नारायण कदम नवीन वसाहत, ओझरवाडी येथील रवींद्र पालांडे, बाळा नाके घर परिसर, बौद्ध समाज स्मशानभूमी, मतेवाडी येथील वसंत देऊ लाड, वसंत बारकू लाड घर ते सार्वजनिक शौचालय, रावतळे स्मशानभूमी, उक्ताड-गुहागरनाका येथील नाजमीन अपार्टमेंट, पेठमाप भागातील श्री देवी करंजेश्वरी मैदान, कब्रस्तान, रेळेकर घर, मुरादपूर मदिना मस्जिद, कब्रस्तान, खंड-कांगणेवाडी येथील सुरेखा चव्हाण, संतोष कांगणे, कानडे घर, अप्पर मोहल्ला जामे मस्जिद, मिठागरी मोहल्ला कब्रस्तान, मापारी मोहल्ला कब्रस्तान, पाग पॉवरहाऊस रिक्षा स्टॉप, पाग मराठी शाळा, खंड-बडदेवाडी रवींद्र डांगे घर, देसाई मोहल्ला कब्रस्तान, खंड सद्गुरू खेडेकर बाबा गृह संकुल ते भावे, मिरगल घर, गोवळकोट एन्रॉन ब्रिज काशिराम पवार जागा, गोवळकोट मुख्य रस्ता ते जयराम भागवत घर, ढवणनाका मुकुंद बुरटे घर ते रस्ता, सुरेश कदम घर ते शंकर पेढांबकर घर, मक्का मस्जिद ट्रस्ट कब्रस्तान, गणेश खोपटकर घर ते अशोक खोपटकर घर, पाग आळी येथील संभाजी ओतारी घर नाला परिसर, फकीर मोहल्ला कब्रस्तानला, श्री देवी एकविरा मंदिर वडनाका, मार्कंडी येथील अथर्व रेसिडेन्सी ते समीर वाजे घर, पागझरी चितळे घर ते मुख्य नैसर्गिक वहाळ परिसरात झालेल्या व सध्या कामे सुरू असलेल्या संरक्षक भिंतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे. त्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांना तांत्रिक लेखी अभिप्राय सादर करावा लागणार आहे. तपासणीत सर्व कामे चांगली झाल्याचे स्पष्ट झाल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र कामांमध्ये काही त्रुटी निघाल्यास त्या तातडीने दूर करण्याचे काम प्रशासन करणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करता हे स्ट्रक्चरल ऑडिट महत्वाचे ठरणार आहे.