!मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री श्री १०८ महंत प. पूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे संकल्पनेतून स्थापन झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट या मठाच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गरीब विध्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले.

सरस्वती विद्यालय मसदे येथील इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनींना आणि अंगणवाडी (क्रमांक ९५)मसदे गावठण च्या सव॔ विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत खाऊ आणि वहृया वितरण, सौ इंदिरा बाई वर्दम हायस्कूल पोईप या शाळेतील इयत्ता ८वी तील गरीब, होतकरू विद्यार्थी वंश बाबाजी परब याला सर्व शैक्षणिक साहित्य मठाचे विश्वस्त साईप्रसाद पेडणेकर,कोमल पेडणेकर, सिता गावडे, तुकाराम माळकर, उमेश मुणगेकर,राजु रावले, संतोष हिवाळेकर, मिनाक्षी गावडे, मुख्याध्यापक विकास न्हानु कुंभार, सरस्वती विद्यालय मसदेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद सदानंद पाटील, सहशिक्षिका शैलेजा नरसाळे, अंगणवाडी सेविका दिपिका दत्ताराम आंबेरकर, मदतनीस -लता मसदेकर सव॔ विद्यार्थी विद्यार्थिनी आणि मान्यवर उपस्थित होते












