विकासभाई सावंत यांना साश्रु नयनांनी भावपूर्ण निरोप

अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी : मान्यवरांकडून आदरांजली 

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिक्षणमहर्षी विकासभाई सावंत यांचे काल मंगळवारी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यानंतर आज शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

सकाळपासूनच येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात ठेवलेल्या त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी ठेवलेल्या त्यांच्या पार्थिवाजवळ राजकीय, सामाजिक, सहकार तसेच शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे सहकारी, मित्र, कुटुंबीय, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि विकासभाईंच्या आठवणी स्पष्ट दिसत होत्या. यावेळी उपस्थित आणि त्यांच्या प्रतिमेला तसेच पार्थिवाला पुष्प अर्पण करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकासभाईंच्या कार्याची आठवण करून दिली. त्यांच्या साधेपणा, समाजासाठीचे त्यांचे योगदान आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी त्यांनी घेतलेली भूमिका या आठवणींना उजाळा दिला. विकास सावंत यांनी आपल्या सर्व शैक्षणिक संस्थांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. शाळा हाच त्यांचा ध्यास होता. विकास सावंत यांच्या निधनाने ‘एका समर्पित जीवनाचा’ अंत झाल्याची भावना माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार राजू शेट्टी यांनी शोक व्यक्त करत सावंत परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत अशा भावना व्यक्त केल्या.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, उबाठा जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,

माजी नगराध्यक्ष तथा कै. भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,

जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजू मसुरकर, शिवसेना विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, मराठा समाज जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे, काँग्रेसचे पदाधिकारी रवींद्र उर्फ बाब्या म्हापसेकर, महेंद्र सांगेलकर, अरुण भिसे, समीर वंजारी, सौ. साक्षी वंजारी, शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख ॲड. नीता कविटकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सी.एल.नाईक, डॉ. दिनेश नागवेकर, व्ही. बी. नाईक, सतीश बागवे, शैलेश नाईक, माजी नगरसेवक मनोज नाईक, ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, आनंद नेवगी, संजय पेडणेकर, सुनील पेडणेकर, गुरुदास मठकर, भाजपचे पदाधिकारी महेश धुरी, रविकिरण तोरसकर, जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर आदींसह विविध क्षेत्रातील शेकडो मान्यवरांनी उपस्थित राहत अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली.

त्यानंतर दुपारी १२ वाजता त्यांचे पार्थिव माजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले तिथून अंत्ययात्रा सुरू झाली. फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची अंतिम यात्रा स्मशानभूमीकडे निघाली यावेळी नागरिकांनी त्यांना आदराने अभिवादन केले. अनेकजण भावूक झाले होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

अखेरीस, त्यांचा मुलगा विक्रांत सावंत यांच्या हस्ते शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनिल राऊळ, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, जिल्हा बँक संचालक निता राणे, गजानन गावडे, ॲड. सुभाष पणदूरकर, समीर सावंत, रमेश पै, अमोल सावंत, आनंद परूळेकर, अमरसेन सावंत, किरण टेंबुलकर, सतीश घोटगे, एल.पी. पाटील, बी.व्ही. मालवणकर, माजी सभापती राजेंद्र परब, सौ. गीता परब, नूतन सावंत, शिला सावंत, भारती मोरे संतोष सावंत, काका मांजरेकर, के.टी.परब, सोनाली सावंत, आनंद नेवगी, संजू शिरोडकर, तुषार वेंगुर्लेकर, नारायण सावंत, मेघश्याम काजरेकर, अभय पंडीत, बाळासाहेब पाटील, वसुधा मुळीक, हर्षवर्धन धारणकर, बाळासाहेब नंदीहळ्ळी, राजन म्हापसेकर, शैलेश पै, अजय गोंदावळे, भाई देऊलकर, हेमंत बांदेकर, संपत देसाई, डॉ. जयेंद्र परुळेकर, शब्बीर मणियार, ॲड. संदीप निंबाळकर, ॲड. पी.डी. देसाई, सत्यजित धारणकर, शैलेश गौंडळकर, निशांत तोरसकर, आशिष सुभेदार, समीरा खलिल, तौकीर शेख, प्रा‌.लवटे, बाळा गावडे, आबा सावंत, भरत गावडे, संदिप कुडतरकर, चंद्रकांत कासार, कौस्तुभ पेडणेकर, बंटी पुरोहित, माया चिटणीस, संप्रवी कशाळीकर, ॲड‌. राघवेंद्र नार्वेकर, शिवाजी सावंत, संदीप राणे, जगदीश धोंड, रवी जाधव, अभिजित सावंत, रामा वाडकर, अभय शिरसाट, अनामारी डिसोझा, जावेद खतिब, जेम्स बोर्जीस, मार्टीन आल्मेडा, संजय लाड, एस.पी. नाईक, प्रल्हाद सावंत, अनिल भिसे, सुमेधा नाईक, अजय सावंत, डॉ. अर्चना सावंत, महादेव पांगम, म.ल. देसाई, सुधीर पराडकर, बबन राणे, रवी सावंत, रेवती राणे, संदीप गवस, संतोष गांवस, संजय कानसे, सागर नाणोसकर,शामराव माने, अवधूत मालवणकर, केदार म्हसकर, नामदेव मुठे, अभिषेक कशाळीकर, रवी जाधव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी विकास सावंत यांना आदरांजली अर्पण केली.

विकासभाई सावंत हे कायमच त्यांच्या कार्यामुळे आणि स्मृतींमुळे लोकांच्या मनात जिवंत राहतील. त्यांच्या निधनाने एका कर्तृत्ववान नेत्याला आपण गमावले असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत होती.