शहरातील युवकांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील भाजी विक्रेत्या महिलांना सौ. अर्चना घारे परब यांच्या माध्यमातून छत्र्यांचे वाटप करण्यात आले. शहरांमध्ये खेड्यापाड्यातून भाजी विक्रेत्या महिलांना ऊन वारा पावसापासून संरक्षण होण्यासाठी छत्र्या देण्यात आल्या. छत्र्या वाटपातून महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आपल्याला आनंद वाटला. भविष्यात या महिलांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही यावेळी अर्चना घारे परब यांनी दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रविणभाई भोसले, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जावेद खतीब, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष नझीर शेख, अल्पसंख्यांक सावंतवाडी तालुकाध्यक्ष जावेद शेख, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, महिला निरीक्षक रत्नागिरी जिल्हा दर्शना बाबर देसाई, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर चिटणीस राकेश नेवगी, युवक तालुकाध्यक्ष हर्षद बेग, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, सौ. मारिता फर्नांडिस,जिल्हा सरचिटणीस उद्योग व्यापार नियाज शेख, तालुका उपाध्यक्ष उद्योग व्यापार याकूब शेख, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी शहरातील झिरंगवाडीतील युवक व महिलांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.
यावेळी सौ. अर्चना घारे परब म्हणाल्या, राष्ट्रवादी पक्षात कधीच जाती-धर्माचे राजकारण केले जात नाही. प्रत्येक समाजाच्या पाठीमागे आज पक्ष उभा राहिला आहे. आज शहरातील झिरंगवाडी भागामध्ये जो विकास हवा होता तो विकास गेले कित्येक वर्ष रखडलेला आहे. तेथील नागरीकांच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण न झाल्याने आज त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावर विश्वास ठेवला आहे. भविष्यात हा त्यांचा विश्वास सार्थकी लावण्याबरोबरच त्यांना राष्ट्रवादी परिवारात मानाचे स्थान देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी मतदार संघावर राष्ट्रवादीचा दावा
सावंतवाडी मतदार संघ हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला होता. त्यामुळे या मतदारसंघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावागावात मोहीम राबविली जाणार आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढलो तरीही सावंतवाडी मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच सावंतवाडी विधानसभेसाठी अर्चना घारे परब याच उमेदवार असतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
फोटो –
सावंतवाडी शहरातील भाजी विक्रेत्या महिलांना छत्र्यांचे वाटप करताना राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब सोबत जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व अन्य ( जतिन भिसे )
Sindhudurg











