दापोली- कुडावळे येथे सर्पदंशाने एकाचा मृत्यू

दापोली – दापोली तालुक्यातील कुडावळे गावातील शेतकरी दीपक लक्ष्मण पवार (वय ३४ ) हे दिनांक १० जुलै रोजी शेतात कामासाठी गेले असता त्यांना सर्पदंश झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र दापोली येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले ; मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच ११जुलै रोजी सकाळी पावणे नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला. दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.