रत्नागिरी :
आस्था दिव्यांगांसाठी समर्पित संस्था असून दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी कार्यरत आहे.श्रवण बाधित दिव्यांगां करिता संस्थेमार्फत 2018 पासुन या”कानमंत्र श्रवण सक्षमतेचा ” प्रकल्पा अंतर्गत आपण नियमितपणे आस्था मध्ये शिबीर आयोजित करत होतो. त्या शिबिरादरम्यान निदान झालेल्या बालकांची शस्त्रक्रिया होऊन नियमित थेरेपी दिल्यामुळे ते बालके आता मुख्य प्रवाहात येऊन समावेशित शिक्षण पद्धतीने शिक्षण घेत आहेत.
सातत्याने प्रयत्न करून देखील गरजु आपल्यापर्यंत रत्नागिरी जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेमुळे, कदाचित परवडत नाही म्हणून,सहज पोहचु शकत नाही म्हणून, गरजु वंचीत राहत आहे असे निदर्शनास येत होते.हे विचारात घेऊन आपण लोकांपर्यंत पोहोचणे गरजे होते.
या करिता फिरते श्रवण चाचणी केंद्र असण्याची गरज होती. पुणे येथील रामराज्य सहकारी बँकेचे संचालक श्री.रामकृष्ण फुले, श्री.संदेश इनामके यांच्या प्रयत्नातून व रिटेनमायर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,ठाणे यांच्या सामाजिक बांधिलकी प्रकल्पातुन मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. रोहीत राऊत व जनरल मॅनेजर श्री. संजीव चव्हाण यांनी निधी उपलब्ध करून दिला.या फिरत्या श्रवण चाचणी केंद्रामध्ये नवजात बालकांसह, प्रौढांकरता ओ. ए. ई, बेरा, पी.टी. ए. इत्यादि श्रवण चाचण्या तंत्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी साऊंड ट्रीटेड रूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्यामुळे श्रवणबाधितांच्या योग्य वेळी तपासण्या होऊन, पुढील उपचार शक्य झाल्याने त्यांना आयुष्यभर श्रवणदोष व त्याचे परिणाम सहन करावे लागणार नाही व ते समाजाचा मुख्य प्रवाहात येतील.
या फिरत्या श्रवण चाचणी केंद्राचे उदघाट्न. मा.श्री. शामसुंदर काळे यांच्या हस्ते नारळ वाढवून व सौ. चंद्रकला पाथरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या प्रसंगी चिंतामणी मोटार्स चे श्री उज्वल साठे, श्रीमती इंदुमती भुजबळ, कान नाक घसा तज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण,
ऑडिओलॉजिस्ट श्रीम. प्राजक्ता भोगटे-सातवसे, आदित्य कन्स्ट्रक्शनच्या श्रीम.अनघा शिरीष जैतपाळ, राष्ट्रसेविका समितीच्या सौ.उमा दांडेकर आस्था चे
अध्यक्ष सौ. सविता शामसुंदर काळे, उपाध्यक्ष ऋषिकेश दिलीप दाभाडे, सचिव श्रीम.सुरेखा पाथरे, खजिनदार श्रीम.साक्षी संजय चाळके, स्पीच थेरपीस्ट श्री संकेत संजय चाळके , सहाय्यक श्री कल्पेश प्रमोद साखरकर, आस्था थेरपी सेंटर च्या प्रमुख संपदा कांबळे व सर्व कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.









