भजन कलेचा वारसा टिकणे आवश्यक! जिल्हाध्यक्ष संतोष कानडे. भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गच्या मालवण तालुकास्तरीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

मसुरे | झुंजार पेडणेकर भजनी कलाकारांना न्याय मिळणे तसेच भजन कला अधिक संपन्न व्हावी, वारसा टिकून रहावा यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. भजनी कलाकारांनी एकत्र येणे आवश्यक आहे. जिल्ह्यात भजन सदन होण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. भजनी कलाकारांना पंढरपूर पर्यंत पायीचे आयोजन करण्यात आले होते.20-20 डबलबारी भजन बुवांना सुद्धा एकत्र करून काम करण्यात येणार आहे. मालवण तालुका कलाकारांची खाण आहे. प्रत्येक कलाकाराने संस्थेचा सभासद होऊन शासनाच्या योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष संतोष कानडे यांनी मसूरे येथे केले.

“भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग” च्या वतीने मालवण तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन संस्था अध्यक्ष संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे मर्डे सभागृहात करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक डॉ दीपक परब, कामगार नेते प्रकाश परब, कलाकार मानधन समिती सदस्य अजिंक्य पाताडे, सचिव गोपीनाथ लाड, वैभव खानोलकर, सदानंद कसालकर, संतोष मिराशी, योगेश सामंत, तुळशीदास बागवे, संतोष पाताडे, संतोष मसुरकर, मकरंद सावंत, दाजी बांदकर, संजय चव्हाण, बाबाजी भोगले, महेश पालव,सतीश रावराणे, नामदेव गिरकर, पंढरीनाथ मसूरकर, राजेश गावकर आदी उपस्थित होते. यावेळी उधोजक डॉ दीपक मुळीक परब म्हणाले, भजन गणपती पुरते राहू नये. भजन कलेमध्ये चांगले कलाकार सिंधुदुर्गात आहेत. तुमच्या कलेवर श्रद्धा ठेवा. 20-20 डबलबारी भजनामध्ये काही ठिकाणी चुकीचे प्रकार होत आहेत. याला निर्बंध बसणे गरजेचे आहे. बोलून मनोरंजन करण्यापेक्षा पारंपरिक भजन करावे. मसूरे गावात भजन महोत्सव आयोजित करण्यात येईल. भजन कला टिकून राहण्यासाठी सर्वते सहकार्य माझ्या कडून मिळेल असे सांगितले.

कामगार नेते प्रकाश परब यांनी भजन ही कला परमेश्वराच्या जवळ नेणारी कला आहे. अनेक नवोदित भजनी बुवा, मृदूंग वादक जिल्ह्यात नावारूपास येत आहेत ही चांगली बाब आहे असे संगितले. तसेच दत्त गुरूंचे गीत सादर केले. यावेळी वैभव खानोलकर, अजिंक्य पाताडे यांनी उपस्थित भजनी बुवा, कलाकार यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल मसुरे गावचे सुपुत्र पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा अध्यक्ष संतोष कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कलाकार मानधन विमा योजना, कलाकार ओळखपत्र, भजन परंपरा संवर्धन व जतन, भजन कार्यशाळा मार्गदर्शन शिबिर घेणे, शासकीय योजना कलाकारांसाठी आहेत याविषयी शासन दरबारी पाठपुरावा करणे, नवीन सदस्य नोंदणी, ज्येष्ठ कलाकारांना मार्गदर्शन करणे, अशा विविध प्रश्नांसंदर्भात नियोजन करण्यात आले.तसेच शाळेचे सभागृह उपलब्ध करून दिल्या बद्दल भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलचे अध्यक्ष कामगार नेते प्रकाश परब यांचे आभार मानण्यात आले. यावेळी या संस्थेचे मार्गदर्शक म्हणून मसुरे सुपुत्र उद्योजक डॉक्टर दीपक परब आणि कामगार नेते प्रकाश परब यांची निवड जाहीर केली. यावेळी राजू प्रभूगावकर, अशोक बागवे, महेश हडकर, बाबुराव गोलतकर, आबा तुरी, हिरबा तोंडवळकर, पपू मुळीक, विशू तोंडवळकर, सचिन कातवणकर, गणेश चव्हाण, श्री परब, श्री ठाकूर तसेच मालवण तालुक्यातील भजनी बुवा, कलाकार बहुसंख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक गोपीनाथ लाड, सूत्रसंचालन बाबू आंगणे यांनी केले.