चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातील कृष्णेश्वर नगर पाग येथील कु.शांभवी दिपाली दिपक खोचरे हिने देखील सी.ए. परिक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात चिपळूण शहरातील तीन विद्यार्थ्यांनी सी.ए. होण्याचा बहुमान पटकावला आहे.
कु.शांभवी खोचरे हिचे सिनिअर के.जी. ते दहावी पर्यंतचे शिक्षण ख्रिस्त ज्योती इंग्लिश मिडीयम स्कूल चिपळूण येथे झाले. नंतर तिने पुणे येथील एस.पी. कॉलेज मधून वाणिज्य शाखेतील पदवी व पदव्युत्तर पदवी घेतली आहे. कु.शांभवी हिने पुणे येथील पी.एच.मेहेंदळे अँड कंपनी व चिपळूण येथील करमरकर नाईक अँड असोसिएट येथून प्रशिक्षण घेतले आहे. कु.शांभवी हिचा भाऊ सूरज याने पुणे येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून पदवी मिळवली असून त्याने अमेरिकेमधील ह्युस्टन युनिव्हर्सिटी मधून मास्टर डिग्री घेतली आहे, सध्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मधून तो पी.एच.डी. करीत आहे. कु.शांभवी हिचे काका संदीप खोचरे हे दापोली येथील प्रसिद्ध सी.ए. आहेत. कु.शांभवी खोचरे हिचे वडील दीपक खोचरे हे पूर्वी घरडा केमिकल्समध्ये नोकरी करीत होते, आता ते पुणे येथील खाजगी कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत, तर आई सौ. दिपाली खोचरे – पडवळ या खेर्डी येथील मिस्टिकल प्रोपॅक प्रा. लि. मध्ये युनिट हेड म्हणून कार्यरत आहेत. कु.शांभवी खोचरे हिला सी.ए. होण्यासाठी आई-वडील, काका व सौ. सुवर्णा प्रल्हाद जोशी तसेच ठाणे येथील सी.ए. प्रथमेश पोखरणकर व पुणे येथील सी.ए. श्रीमती कारभारी यांचे विशेष पाठबळ मिळाले असल्याचे तिने आवर्जून नमूद केले आहे. तिच्या यशाबद्दल तिचे घरडा केमिकल्स परिवार विशेष अभिनंदन केले आहे. मिस्टिकल परिवार व संपादिका श्रीमती शुभदा जोशी, सौ. अश्विनी जोशी व उद्योजक राजू जोशी यांनी देखील तिचे विशेष अभिनंदन केले आहे.











