महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धापन दिन वेंगुर्ले तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा…

वेंगुर्ले l प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून समितीच्या वेंगुर्ला शाखेमार्फत सभासद नोंदणी व संपर्क अभियान शुभारंभ, वृक्षारोपण, वेताळबांबर्डे येथील नाग्या महादू कातकरी वसतिगृहातील मुलांना औषध,गोळ्या व खाऊ चे वाटप असे विविध उपक्रम राबवून करण्यात आला.

शिक्षक समितीचे संस्थापक श्री.भा. वा.शिंपी गुरुजी, श्री. जॉन रॉड्रिग्ज गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वर्धापन दिन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी समिती चे कोकण विभाग सचिव श्री.संतोष परब, जिल्हा कोषाध्यक्ष श्री कालिदास खानोलकर, तालुका कार्याध्यक्ष श्री किरण मुडशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

त्या नंतर सभासद नोंदणी व संपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तालुका शाखेमार्फत कोकण विभाग सचिव श्री.संतोष परब यांना प्रातिनिधिक स्वरूपात सभासद पावती देऊन या अभियानाचा शुभारंभ केला गेला. तर मठ कणकेवाडी शाळा येथे वेंगुर्ला तालुक्यातील राज्य व जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोकण विभाग सचिव श्री.संतोष परब, शिक्षक समिती जुनी पेन्शन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख श्री शंकर उर्फ राजू वजराटकर, जिल्हा कोषाध्यक्ष श्री.कालिदास खानोलकर, जिल्हा कार्यालयीन चिटणीस श्री.कर्पूरगौर जाधव, तालुकाध्यक्ष श्री प्रसाद जाधव, शिक्षक पतपेढी वेंगुर्ला शाखा संचालक श्री सिताराम लांबर, विभागीय अध्यक्ष श्री.प्रकाश भोई यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते.

दरम्यान वर्धापन दिनानिमित्त वैशिष्टयपूर्ण उपक्रम म्हणजे वसतीगृहातील मुलांची भेट. बालके शिक्षक आणि शिक्षण यांची पक्षपाती असणारी संघटना म्हणजेच आपली शिक्षक समिती च्या स्थापना दिनानिमित्ताने कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील नाग्या महादू कातकरी वसतिगृह येथे भेट देऊन तेथे वास्तव्यास असलेल्या मुलांना आवश्यक असणाऱ्या औषध व गोळ्यांचे वितरण व खाऊ वाटप वेंगुर्ला तालुका शाखेमार्फत करण्यात आले. तेथील मुलांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यातून मुलांना आरोग्यदायी, दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी वेंगुर्ला तालुका शाखेमार्फत त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन तालुका शाखेमार्फत दिले. यावेळी या वसतिगृहाचे संचालक श्री उदय आईर यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेंगुर्ला शाखेमार्फत राबवलेल्या या उपक्रमाबद्दल तालुका शाखेचे आभार मानले व धन्यवाद दिले.

यावेळी तालुकाध्यक्ष श्री.प्रसाद जाधव, तालुका सचिव श्री. रामा पोळजी, शिक्षक समिती जुनी पेन्शन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख श्री शंकर वजराटकर, जिल्हा कोषाध्यक्ष श्री कालिदास खानोलकर, जिल्हा कार्यालयीन चिटणीस श्री.कर्पूरगौर जाधव, शिक्षक पतपेढी वेंगुर्ला शाखा संचालक श्री सिताराम लांबर, अंतर्गत हिशोब तपासनीस श्री.रामचंद्र मळगावकर, विभागीय अध्यक्ष श्री. प्रकाश भोई, शिक्षक नेते श्री.सिताराम नाईक, तालुका सचिव श्री.रामा पोळजी, तालुका कार्याध्यक्ष श्री.किरण मुडशी, महिला आघाडी अध्यक्ष श्रीम. ऋतिका राऊळ, महिला आघाडी सचिव श्रीम.सरोज जानकर, महिला आघाडी शिक्षक नेत्या श्रीम.नेहा गावडे, मठ केंद्र संघटक श्रीम.राजश्री भांबर, सल्लागार श्री एकनाथ जानकर, श्री.सिद्धेश्वर मुंडे, कणकेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. वीरधवल परब आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.