साम्राज्य ग्रुप फाउंडेशन कोकण विभागातर्फे २८ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

चिपळूण (वार्ताहर) : साम्राज्य ग्रुप फाउंडेशन कोकण विभागातर्फे सोमवार दि. २८ जुलै रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील खेर्डी येथील संजीवनी सर्जिकल व जनरल हॉस्पिटल येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे शिबीर होईल.
साम्राज्य ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही विधायक शैक्षणिक, सामाजिक व अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे. मुळव्याध व पोटविकार तज्ञ डॉ. अक्षय विजय यादव व स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉ. पूजा ओंकार भुरण हे या शिबिरात रूग्णांना सल्ला, उपचार व मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात मुळव्याध, अपेंडिक्स, भगंधर, गर्भाशय पिशवीचा आजार, फिशर, मुलींचे वयात येताना होणारे बदल, हर्निया, हायड्रोसील, पाळी जाताना व गेल्यानंतर होणारे बदल, वंध्यत्व – गर्भधारणेत अडथळा येणे, स्तनातील गाठी व आजार, कुटुंब नियोजन पद्धतीची माहिती व मार्गदर्शन, सर्व प्रकारच्या अंगावरील गाठी, प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतरची तपासणी तसेच गर्भ पिशवीच्या मुखाचा कॅन्सरची तपासणी फक्त २५० रूपयांमध्ये केली जाईल. गरजू रुग्णांसाठी अल्प दरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी अक्षय भाऊ पवार (७८७५४५१२४६), नारायण भाऊ येळकर (७७७६८६३७१६), सिद्धार्थ भाऊ पोल (७४४७५५७०७६) यांच्याकडे संपर्क साधावा. या शिबिराचा जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन साम्राज्य ग्रुप फाऊंडेशन कोकण विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.