
२६ जून रोजी होणार मोदी@९ महाजनसंपर्क अभियानाचा जागर
राजापूर (प्रतिनिधी): राजापुरात भाजपाच्या वतीने सोमवारी २६ जून रोजी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या भव्य दिव्य सभेत राजापुरात मोदी@९ महाजनसंपर्क अभियानाचा जागर होणार आहे. या सभेची जय्यत तयारी भाजपाच्या वतीने हाती घेण्यात आली असून पावसाळयाचे दिवस असल्याने या सभेसाठी राजापूर हायस्कुल मैदानावर वॉटरफ्रुट मंडप टाकरण्यात येणार आहे.
राजापूर हायस्कुलच्या मैदानावर होणाऱ्या य सभेची जोरदाय तयारी भाजपाचे मोदी@९ महाजनसंपर्क अभियानाचे सहसंयोजक प्रमोद जठार यांच्या मार्गदशनाखाली भाजपाचे जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत.
मोदी@९ महाजनसंपर्क या अभियानांतर्गत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात गेल्या महिनाभरात राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा या बैठकीत घेतानाच मान्यवरांचे मार्गदर्शन या सभेत होणार आहे.
सोमवारी २६ जून रोजी दुपारी 3 वाजता राजापूर हायस्कुरच्या पटांगणावर ही जाहीर सभा होणार आहे. या सभेला मुंबई प्रदेशाध्यक्ष आ. आशिष शेलार, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, अभियान राज्य प्रभारी आ. प्रवीण दरेकर, माजी खासदार निलेश राणे, आ. नितेश राणे आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा २०१४ ते २०२४ हा काळ भारतासाठी ‘विकासाचा अमृतकाळ’ असून त्यातील ९ वर्षात प्रत्येक घटकाचा विकास करताना सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या सूत्रावर मोदी सरकारने काम केले. केंद्र सरकारच्या याच यशस्वी कामगिरीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला जाणार आहे.
या जाहीर सभेला रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातून मोठ्या प्रमाणातून कार्यकर्ते, पदाधिकारी, भाजपप्रेमी उपस्थित रहाणार आहेत.
अद्याप मान्सून जरी सक्रीय झाला नसला तरी कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेसाठी वॉटर फ्रुप मंडप उभारण्यात येत आहे. त्याचे काम सध्या वेगाने राजापूर हायस्कुल मैदानावर सुरू आहे. या सभेच्या एकूणच नियोजनासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.
फोटो 23 आरजेपी 1
राजापुरात सोमवारी केंद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जाहीर सभेसाठी राजपूर हायस्कुलच्या पटांगणावर भव्य वॉटरफ्रुप मंडप उभारण्याचे सुरू कामे












