
रत्नागिरी ते जयगड बोरिया मार्गावर पर्वतीचा 5 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर प्रवास
रत्नागिरी ः प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 2 महाराष्ट्र नेव्हल एन.सी.सी तर्फे ‘कोकण रत्न्ा’मेनू 2025 या सागरी मोहिम कॅम्पचे 5 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2024 या 10 दिवसांच्या कालावधीत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कमांडर के.राजेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कॅम्पचे ठिकाण रत्नागिरी ते जयगड, बोरीया, परत त्यामार्गी रत्नागिरी असे असून कॅम्पमध्ये पूणे, मुंबई ‘अ’, मुंबई ‘ब’, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर एन.सी.सी ग्रुप हेडक्वॉटर मधून एकूण 60 राष्ट्रीय छात्र सेनेचे एन.सी.सी कॅडेट सहभागी होणार आहेत. या मोहिमेत 10 दिवसांमध्ये 122 नॉटिकल अंतर पार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच या कॅम्पच्या माध्यमातून गणपतीपुळे, जयगड, बोरीया येथे समुद्राची जनजागृती अभियानांतर्गत “हमारा समुद्र‘हमारी शान” याबाबत पथनाट्यातून राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटमार्फत सागरी किनारे स्वच्छतेचा संदेशही देण्यात येणार आहे.
चौकट – दरवर्षी जानेवारी महिन्यात होणारी ही सागरी मोहिम कोरोनानंतर नोव्हेंबर,डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. या कालावधीत समुद्र शांत तसेच वार्याचा वेग योग्य असल्याने यावर्षी ही मोहिम नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे.











