गेल्या 24 तासांत 535.15 मिमी पावसाची नोंद
रत्नागिरी : रत्नागिरी शहर आणि परिसरात शनिवारची सुरुवात मुसळधार पावसाने झाली असून, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर तिसऱ्या दिवशीही कायम आहे. जिल्ह्याभरात संततधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या 24 तासांत (दिनांक 26/07/2025 रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 535.15 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर जिल्ह्याचा एकूण सरासरी पाऊस 59.46 मिमी राहिला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद खेड तालुक्यात झाली असून, तेथे 109.00 मिमी पाऊस कोसळला आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी खालीलप्रमाणे:
* मंडणगड: 68.25 मिमी
* खेड: 109.00 मिमी
* दापोली: 76.85 मिमी
* चिपळूण: 60.78 मिमी
* गुहागर: 29.80 मिमी
* संगमेश्वर: 52.58 मिमी
* रत्नागिरी: 32.77 मिमी
* लांजा: 55.00 मिमी
* राजापूर: 50.12 मिमी
सततच्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, काही ठिकाणी जनजीवनावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.












