वेंगुर्ले l प्रतिनिधी :तालुक्यातील तुळस येथील रहिवासी आणि प्रसिद्ध समलोचक अजय नाईक यांच्या मांगर घरात आलेल्या सुमारे १० फुटी आजगराला सर्प मित्र महेश राऊळ यांनी अथक परिश्रमातून सुरक्षितरित्या पकडले आणि नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले आहे.
अजय नाईक यांना आपल्या मांगर घरात कोणीतरी जनावर असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याबाबत सर्पमित्र महेश राऊळ यांना कळविले. महेश राऊळ यांनी तेथे येऊन पाहिले असता तो भला मोठा अजगर असल्याचे निदर्शनाला झाले. त्यांनी सुरक्षितरीत्या त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. वेताळ प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांचेही त्यांना सहकार्य लाभले.













