कुणकेश्वर तीर्थक्षेत्र झाले सज्ज
कुणकेश्वर तीर्थक्षेत्री होणार शिवशंभोचा गजर
शिवभक्तांची पाऊले कुणकेश्वरकडे लागली वळू
देवगड l प्रतिनिधी : उद्यापासून श्रावणी सोमवार उत्सवाला सुरूवात होत असून दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या कुणकेश्वर तीर्थक्षेत्री पहिल्याच श्रावण सोमवारी शिवशंभोचा दर्शनासाठी व शिवशंभोच्या नामगजरासाठी शिवभक्तांची पाऊले कुणकेश्वर येथे वळू लागली आहेत.भाविकांच्या दर्शनासाठी देवस्थान टड्ढस्टच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे.
२८ जुलैपासून पहिल्या श्रावणी सोमवारी उत्सवाला सुरूवात होत असून यासाठी श्रीक्षेत्र कुणकेश्वर भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाले आहे. २८ जुलै रोजी पहिल्या श्रावणी सोमवारपासुन या उत्सवाला सुरूवात होत आहे.२८ जुलै, ४,११ आणि १८ ऑगस्ट अशा चार श्रावणी सोमवारी हा उत्सव पार पडणार आहे.या उत्सवाच्या निमित्ताने भाविक भक्तांसाठी सुरळीत दर्शन व्यवस्था, पोलिस बंदोबस्त, पार्किंग आणि वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.प्रत्येक श्रावणी सोमवार निमित्त प्रथम पूजेचा मान प्रतिष्ठित मान्यवरांना देण्यात येता.यंदा पहिल्या श्रावण सोमवारी पुजेसाठी सुरेश नेरूरकर(प्रसिध्द उद्योजक, मालवण) व आनंद शिरवलकर(प्रसिध्द उद्योजक, कुडाळ) यांना हा मान देण्यात आला आहे.
प्रथम पूजेनंतर सकाळी ६ वा.पासून भाविकांसाठी दर्शन रांगाना सुरूवात होणार आहे.भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन टड्ढस्टच्यावतीने करण्यात आले आहे.राज्य परिवहन मंडळाच्या देवगड आगारामार्फत विशेष बससेवा चालविण्यात येणार असून देवगड कुणकेश्वर तसेच रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली येथून थेट बससेवा उपलब्ध राहणार आहेत.दर श्रावणी सोमवारी सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत महाराष्टड्ढातील सुप्रसिध्द नामांकित भजनी मंडळांकडून भजनांचे सादरीरकरण होणार आहे.दर्शन व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी देवस्थान टड्ढस्टकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.भाविक, भक्त व पर्यटकांनी टड्ढस्ट आणि संबंधित यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान टड्ढस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले आहे.











