दापोली प्रतिनिधी: संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या ग्रामीण वर्धापन आणि मैत्रेय फाऊंडेशन संचलित सायन ब्लड बँक, मुंबई यांच्या सहकार्याने शनिवार दि.26 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.या रक्तदान शिबीराचा शुभारंभ प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते नारळ वाढवून करणेत आला.
संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या 3 ऱ्या वर्धापन दिन निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दापोली शहरातील राधाकृष्ण मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरासाठी 78 रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केले. दापोली तालुक्यातील लोकांची रक्तासाठी होणारी परवड थांबविण्यासाठी संतोष अबगुल प्रतिष्ठानने 3 वर्षापुर्वी दापोलीमध्ये ब्लड स्टोअरेज आणुन लोकांना दिलासा दिला आहे. याआधी गेली अनेक वर्ष दापोली तालुक्यातील गरोदर मातांना, थँलेसिमिया आजार, अँनिमिया पेशंट तसेच डायलिसिस करीता येथील नातेईकांना महाड, चिपळूण, डेरवण या ठिकाणी रक्ताकरीता जावे लागते होते. याचा नाहक त्रास पेशंटच्या नातेवाईक यांना होत होता हिच गरज लक्षात घेऊन प्रतिष्ठानने दापोलीत दापोली ब्लड स्टोअरेज स्थापन करुन लोकांची परवड थांबविली आहे. तीन वर्षाच्या काळात प्रतिष्ठानने 100 हुन अधिक रक्तदान शिबीरे घेऊन 6000 पेक्षा रक्तकुपनलीकांचे रक्त संकलन करुन दापोली, मंडणगड, खेड येथील रुग्णांना अत्यंत अल्प दरात रक्त उपलब्ध करुन दिले जात आहे. या सोबतच मुंबई सारख्या ठिकाणी केईएम हाँस्पिटल, जे.जे.हाँस्पिटल, नायर हाँस्पिटल, वाडिया हाँस्पिटल यांसारख्या ठिकाणी प्रतिष्ठानचे रुग्णसेवक मोफत सेवा तसेच मोफत टिफिन सेवा देखील देत आहेत. यासोबतचं प्रतिष्ठानचे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवित आहेत. रक्तदान करून प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान करावे जेणेकरून एखाद्या गरजू रुग्णांचा जीव वाचविण्या साठी आपली मदत होईल असे प्रतिष्ठानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
आजचे रक्तदान शिबीराकरीता डॉ.संकेत अस्वले,श्री. सागर बुरटे, प्रज्ञा बुरटे, अंकिता शिर्के, आर्यन प्रभावळकर, सागर आग्रे, निलेश भांबीड, किशोर कानसे, नितिन नटे,विकास चव्हाण, प्रविण सणस, भाई झगडे,स्वप्नील कडु, दीपक धामणे, संतोष पाते, विजय राजपुरे, योगेश टेमकर, प्राजक्ता निवळकर, दिलीप बांद्रे, शशिकांत फिलसे, करण बैकर, रुपेश कुटरेकर, किसन जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.









