चिकोडी रस्त्यावर अपघात: रत्नागिरीच्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधी
रत्नागिरीहून कर्नाटक राज्यात दुचाकीवरुन जाणार्‍या चालकाचा चिकोडी रस्त्यावर अपघात झाला. त्याला जखमी अवस्थेत अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारांदरम्यान मंगळवार 29 जुलै रोजी तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
रवी शिवाजी राठोड (30, रा. मुरुगवाडा- झोपडपट्टी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. अपघाताची ही घटना 17 जुलैला दुपारी 2.30 वा. सुमारास चिकोडी रस्त्यावर घडली होती. रवी राठोड हा गुरुवार 17 जुलैला दुपारी रत्नागिरीहून दुचाकी (एमएच-08 एड्ब्ल्यू 3612) घेऊन मुचकंडीतोडा बागलकोट राज्य-कर्नाटक) असा जात असताना चिकोडी रस्त्यावर दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरील ताबा सुटून पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी तेथील नागरिकांनी शासकीय रुग्णालय बेळगाव येथे दाखल केले होते. त्यानंतर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवार 29 जुलै रोजी सकाळी 8 वा. सुमारास तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयात पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.