कोंडुरा येथे उद्या कै. विद्याधर शिरसाट स्मृती कथाकथन स्पर्धा

 

न्हावेली । प्रतिनिधी : आरोस येथील पारिजात फ्रेंड सर्कल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कै. विद्याधर शिरसाट स्मृती कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा उद्या, शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी कोंडुरा तिठा येथील पारिजात मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा तीन गटांमध्ये विभागलेली आहे: इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी ९४०४७४८९८० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पारिजात फ्रेंड सर्कलने केले आहे.