ज्ञानदीप महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या ‘२० व्या आविष्कार ‘ कार्यशाळेचा उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न

ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य मोरवंडे-बोरज येथे २० व्या ‘आविष्कार ‘ कार्यशाळेचा उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला.
ज्ञानदीप महाविद्यालय व मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास कक्ष यांच्या सयुक्त विद्यमाने ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे-बोरज येथे २० व्या आविष्कार आंतर महाविद्यालयीन स्पर्धेबद्दल माहिती देण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे याचा उदघाटन समारंभ दि. २ ऑगस्ट रोजी संपन्न झाला. यामध्ये रत्नागिरी विभागामधील सर्व महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आविष्कारच्या विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी गुरव, इन्स्टिटयूट फॉर ऍडवान्सड ट्रेनिंग अँड रिसर्च इन इंटरडिसिप्लिनरी सायन्स, मुंबई येथील डॉ. शशिकुमार मेनन, रामनारायण रुईया ऑटोनॉमस कॉलेज मुंबई येथील प्रा. सुनीता शैलजन, डॉ. रूपा राव, डॉ. मनीष देशमुख तसेच डॉ. घनश्याम साठे हे मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे सरचिटणीस मा. श्री. माधव पेठे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन हे अंडर ग्रॅज्युएट ते डॉक्टरेट स्तरावरील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संशोधन संस्कृती आणि वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्याचे व्यासपीठ असून या कार्यशाळेमध्ये अविष्कार या स्पर्धेविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे यामध्ये संशोधन कसे करावे, संशोधनाचा स्थर कसा असावा ते समाजासाठी उपयोगी असावे याबरोबरच अविष्कार स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावर पार करावे लागणारे कॉलेज लेव्हल राउंड्स, झोनल राउंड्स तसेच फायनल राउंड्स याविषयी महत्वाचे मार्गदर्शन २ दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेची प्रस्तावना प्रा. घनश्याम साठे यांनी केली तर कार्यशाळेचे सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे आविष्कार विभाग प्रमुख प्रा. संजोग जाधव यांनी केली तसेच आभारप्रदर्शन प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांनी केले. तसेच या कार्यशाळेसाठी आविष्कार जिल्हा समन्वयक श्री. ठाकूरदेसाई यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले. महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन श्री. दीपक लढढा यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास २० महाविद्यालयांचे २० शिक्षक व ७४ विद्यार्थी तसेच ज्ञानदीप महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस श्री. माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराथी, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन श्री. दीपक लढढा, संस्थेचे सर्व सभासद व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अनंत कुलकर्णी यांचेकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.