बागवे हायस्कूल मसुरे येथे कौशल्य अभ्यासक्रम प्रमाणपत्रांचे वितरण!   

मसुरे | झुंजार पेडणेकर : आर.पी बागवे हायस्कूल मसुरे येथे बहुविध कौशल्य अभ्यासक्रमा अंतर्गत प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे , शाळा समन्वयक शिक्षक श्री रमेश पाताडे, सिंधुदुर्ग प्रकल्प समन्वयक श्री सुचित भोगले तसेच सर्व शिक्षक, उगम 5 चे निदेशक उपस्थित होते. कोदे मॅडम,पाताडे सर, भोगले सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थांना कौशल्य शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले.या बहुविध कौशल्य अभ्यासक्रमामध्ये (MSFC) बागकाम आणि शेती तंत्रद्यान, उर्जा आणि पर्यावरण, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, कार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञान यासारख्या कौशल्य प्रशिक्षणाचा समावेश होतो. रमेश पाताडे यांनी आभार मानले.