जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेत शिरगाव हायस्कूलची सृष्टी पटेल जिल्ह्यात प्रथम

कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड

शिरगाव (प्रतिनिधी) :देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी मणिलाल पटेल हिने जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेत १९ वर्षाखालील ७० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

ही स्पर्धा ६ ऑगस्ट रोजी ओरस येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली.१२ वी कला शाखेत शिक्षण घेत असलेल्या सृष्टीने या स्पर्धेत दमदार कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले.

या उल्लेखनीय यशामुळे सृष्टीची आता कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय जुडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तिच्या यशामध्ये क्रीडा शिक्षक आदिनाथ प्रसाद गर्जे व प्रवीण शेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सृष्टीच्या या कामगिरीबद्दल शिरगाव पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, संस्था पदाधिकारी, संचालक,

शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम,व सदस्य, मानद अधीक्षक संदीप साटम,

मुख्याध्यापक एस एन आतार, पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी

यांनी सृष्टीचे अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.