सात राज्ये, ३८१२ किलोमीटर अन् ४२ दिवस…

डॉ. वाघमारे यांनी उलगडला आव्हानात्मक सायकल प्रवास, चिपळुणात नागरी सत्कार

चिपळूण (प्रतिनिधी):– चायना ते पाकिस्तान बॉर्डर असा सात राज्यातून ३ हजार ८१२ किलोमीटस्चा ४२ दिवस १४ तासांचा टॅन्डम सायकल प्रवास करण्याचा पराक्रम येथील डॉ. मनीषा वाघमारे व बेंगलोरच्या शास्त्रज्ञ मीरा वेलणकर यांनी मे महिन्यात केला. याबद्दल डॉ. वाघमारे यांचा नुकताच येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी प्रवासात आलेले अनुभव कथन करताना हा प्रवास सर्वांसमोर उलगडला.

 

सायकल चालवण्याचा मौसम नोव्हेंबर ते जानेवारी असताना बेंगलोरच्या शास्त्रज्ञ वेलणकर व डॉ. वाघमारे यांनी ही कामगिरी मे महिन्यात केली. यामुळे डॉ. वाघमारे यांचा नुकताच शहरातील सावरकर सभागृहात नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी प्रोजेक्टरवर प्रवासातील सर्व छायाचित्रे दाखवत अनुभव कथन केले.

 

डॉ. वाघमारे म्हणाले, प्रवासात चांगले लोक भेटले. अनेकांनी प्रोत्साहन दिले. काही ठिकाणी कडक उन्हातून, काही ठिकाणी पाऊस व चिखलातून चालतही प्रवास करावा लागला, असे नमूद केले. या कामगिरीला उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली. त्यांचा विविध संस्थांनीही सत्कार केला,

 

यावेळी माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस, उद्योजक प्रशांत यादव, काँग्रेस जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, शिरीष काटकर, बाळा कदम, मनोज शिंदे, कबीर काद्री, रमेश खळे, संजय तांबडे, शफा गोठे, विलास चिपळूणकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, रतन पवार, प्रा. विनायक होमकळस, राधा शिंदे, डॉ. रेहमत जबले, रुही खेडेकर, राजन खेडेकर, राजू गायकवाड, सचिन गायकवाड, शेखर लवेकर, मंगेश वेस्वीकर, संदीप लवेकर, नियाज बेबल, दिनेश शिंदे, इम्रान पालकर, सुरेश केतकर, सतीश कदम, जमालुद्दीन बंदरकर, मंगेश पेठांबकर, अक्षय केदारी, प्राजेश खेडेकर, सनी आंबले आदी उपस्थित होते.