शिवसेनेच्या माध्यमातून कोलगाव येथे शाळा व अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सावंतवाडी । प्रतिनिधी : माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या माध्यमातून कोलगाव गावातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आणि अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा आणि अंगणवाड्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. या समस्यांवर तोडगा काढून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाप्रमुख संजू परब यांचे लक्ष वेधण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले. शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याबद्दल सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनी आभार मानले.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी कोलगाव विभाग प्रमुख सुशांत ठाकूर, विभागीय महिला प्रमुख ॲड. सौ. शितल अभिजीत टिळवे, युवा सेनेचे कोलगाव विभागप्रमुख मुकेश ठाकूर, बुथप्रमुख आदेश गावडे, रविकिरण राऊत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.