न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे स्वागत आणि वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

 

आचरा-अर्जुन बापर्डेकर

ग्रामिण भागातील मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने न्यू इंग्लिश स्कूल आचराचे संस्थाचालक,दानशूर व्यक्तींकडून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन मुलांच्या गरजा पुर्ततेसाठी प्रयत्न करत असतात. कै सखाराम दाजी गावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ माजी शालेय समिती अध्यक्षा निलिमा सावंत यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या वह्यांचे वाटप नुतन शाळा समिती अध्यक्ष जे एम फर्नांडिस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शाळा समिती सदस्य अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले, मुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे,उपमुख्याध्यापक मधुरा माणगांवकर,जाधव,रावले,पारीपत्ये,भावना मुणगेकर, सौ गोसावी, रावले,सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतलेल्या नवीन मुलांचे स्वागत करण्यात आले.