मसुरे | झुंजार पेडणेकर : घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकव ल च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल कार्यालय येथे “ध्वजारोहण कार्यक्रमाचे” आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल व डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा – राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच जि. प. शाळा गोळवण नं. 1 यांच्या सयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल कार्यालय येथे झेंडावंदन, तिरंगा रॅली, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फिज, स्वच्छता, वृक्षारोपण, घरोघरी तिरंगा जनजागृती
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, मुख्याध्यापक संतोष पाताडे, ग्रा सदस्य, तलाठी कोकरे मॅडम, आरोग्य सेवक –
वासुदेव वाडकर,
स्थापत्य अभियंता- संदेश पवार (तंत्रज्ञ प्रकल्प आदर्श गाव),
सागर जाधव
अंगणवाडी सेविका जाधव मॅडम, गावडे मॅडम, लाड मॅडम, सि. आर. पी. – माधवी घाडी, मेस्त्री मॅडम, सत्यवान चव्हाण, संतोष चव्हाण, सुंदर लाड, एकनाथ चव्हाण, नामदेव परब, सुहास घाडी, मालोजी चिरमुले, गणेश गावडे, अजित गोळवणकर, अमित घाडी, मिलिंद पवार, कल्याण मांजरेकर, नंदादीप नाईक, गुरुनाथ पालव, जनार्दन गावडे, समीर लाड, महादेव पवार तसेच कट्टा महाविद्यालय शिक्षक, विध्यार्थी उपस्थित होते.












