शिळ सरपंच अशोक पेडणेकर यांना मातृशोक

 

राजापूर (वार्ताहर): शहरानजीकच्या मौजे शिळ ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक पेडणेकर यांच्या मातोश्री श्रीमती मालती विठ्ठल पेडणेकर (८४) यांचे शुक्रवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

वार्ध्यक्यामुळे गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या प्रेमळ व परोपकारी स्वभावाच्या होत्या.

त्यांच्या पार्थावावर सायंकाळी उशीरा भंडारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व थरातील मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सहा विवाहित मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 

——————————————————