पाचल बाजार पेठेत दहीहंडीचा थरार, २५,५५५ रुपयांची दहीहंडी शिवशक्ती महिला गोंविंदा ने पाच थर लावून फोडली दहीहंडी!!!

पाचल (वार्ताहर): आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपूर्वा सामंत यांच्या सहकार्याने पाचल बाजारपेठ येथे आयोजित दहीहंडी उत्सवाचा थरार पाहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पाच थरावर बांधलेली ही दहीहंडी शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने फोडली. त्यावेळी प्रचंड जल्लोष करण्यात आला. या दहीहंडीसाठी २५,५५५ रुपयांचे बक्षीस व चांदीची गदा ठेवण्यात आली होती.

युवा नेत्या अपूर्वासामंत यांच्या हस्ते शिवशक्ती महिला गोंविंदा पथकाला रोख रुपये २५,५५५/- चांदीची गदा, शाळ श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. पाचलमध्ये असा भव्य दिव्य दहीहंडी उत्सव प्रथमच आयोजित करण्यात आला होता. यासाठी शिवशक्ती महिला गोंविंदा पथकाला निमंत्रित करण्यात आल्याने गोविंदा रसिकांनी हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती.

या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन सुरेश ऐनारकर, संदिप बारसकर, सुनील गुरव, जगदीश उर्फ सोनु पाथरे, सचिन पांचाळ, वैभव वाय कूळ, मयुर रेडिज, राहुल गोसावी, संदीप गुरव अन्य कार्यकर्ते यांनी केले. या दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे यशस्वी सुत्रसंचालन जवळेथर केंद्राचे केंद्र प्रमुख संदिप परटवलकर यांनी केले.