उबाठाचे बालिश पुढारी सुशांत नाईक यांनी स्वतःच्या घरातील भांडणाकडे लक्ष द्यावे

वैभववाडी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अतुल सरवटे यांची टीका 

वैभववाडी l प्रतिनिधी :      राणे कुटुंबावर टीका करणारा उबाठाचा युवा नेता सुशांत नाईक हा बालिश पुढारी आहे. त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावण्यापेक्षा स्वतःच्या घरातील भांडणे मिटवावीत. अशी खरमरीत टीका वैभववाडी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अतुल सरवटे यांनी सुशांत नाईक यांच्यावर केली.

वैभववाडी येथे उबाठाच्या नूतन शाखेचे उद्घाटन पार पडले. यावेळी सुशांत नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्याला सडेतोड उत्तर अतुल सरवटे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिले आहे.

१८ हजार मतदार वाढल्याचा जावई शोध लावणाऱ्या नायकांनी अगोदर मतदार यादीचे वाचन करावे. विधानसभेला तिकीट मिळेल असा शब्द त्यांना विनायक राऊत गटाकडून मिळाला होता. त्यामुळे नाईक अगरबत्ती, धूप वाटत सुटले होते. मात्र उबाठाच्या दुसऱ्या गटाने त्यांचा गेम केला. आणि तिकिटापासून त्यांना कोसोदूर ठेवले. असे पत्रकात सरवटे यांनी म्हटले आहे.

पुन्हा एकदा बालिश बडबड करणाऱ्या नाईकांनी अगोदर तिकीट फायनल करून घ्यावी. नंतर उबाठाची तळी मिरवावी. वैभववाडी शाखेच्या उद्घाटन सोहळ्याला तालुक्यातील आठ आणि बाहेरील साठ अशी परिस्थिती वैभववाडीत आहे. यापूर्वी ज्या जागेत शाखा होती ती शाखा दोन-दोन महिने बंदच होती. आताची तरी नवी शाखा कायम उघडी ठेवावी.

नापणे येथे उभारण्यात आलेला काचेचा पुल हा सिंधूरत्न योजनेतून पूर्ण झाला आहे. या योजनेची कल्पना उबाठाच्या युवा नेत्याला नसावी. हीच मोठी शोकांतिका आहे. स्वतःची जागा तिथे विकास ही संकल्पना नाईक कुटुंबाची आहे. राणे कुटुंब हे दुसऱ्याची प्रगती साधणारे कुटुंब आहे. जिल्ह्याचा रस्ते विकास खऱ्या अर्थाने माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केला आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. सुशांत नाईक यांनी प्रसिद्धीसाठीची आपली बालीश बडबड बंद करावी, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असे सरवटे यांनी म्हटले आहे.