सतर्कतेचा इशारा – अर्जुना नदीची पाणी पातळी इशारा पातळीवर
राजापूर |प्रतिनिधी
अर्जुना नदीची पाणी पातळी (राजापूर पूल) येथे आज दिनांक १८/०८/२०२५ सकाळी ९.०० वा. पाणीपातळी ५.२० मीटर झाली असून ती इशारा पातळीच्या वर आहे.
नागरिकांनी खबरदारी घ्यावी
नदीकाठच्या भागात जाऊ नये
सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी
प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार विकास गंबरे यांनी केले आहे










