आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्या मालवणात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा

मालवण | प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्राचे संस्थापक तथा शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या माध्यमातून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मंगळवार 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मालवण शहर येथील मामा वरेकर नाट्यगृह समोर संपन्न होणार आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व शिवसेना पदाधिकारी यांचीही उपस्थिती असणार आहे. अशी माहिती शिवसेना मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर यांच्या वतीने देण्यात आली आहे.

 

जनतेला अधिकधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सातत्याने प्रयत्नशील आहेत. विकासकामे, सेवा सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.