स्पेक्टोमार्टची नववी शाखा शिरगाव येथे ग्राहकांच्या सेवेत दाखल

पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते उद्घाटन

देवगड:    देवगड तालुक्यातील शिरगाव बाजारपेठ येथे स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्सच्या नवव्या शाखेचे उद्घाटन पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते करण्यात आले. ह्यूमन राइट्स असो.फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक , प्रणय बांदिवडेकर, श्रीकृष्ण दुधवडकर, शिरगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर साटम, राष्ट्रपती पदक विजेते किशोर राणे, सामाजिक कार्यकर्त्या सुगंधा साटम, दिपाली घाडी,सानवी चिंदरकर, दक्षता जोइल, जिग्नेश कदम, अनिल चव्हाण,अक्षय शिंदे, ओमकार गोंधळी, सुभाष जाधव, रोहन शारबिद्रे,निखिल भुवड, माधुरी चव्हाण, सुनील चव्हाण, सखाराम चव्हाण संजय, चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते. स्पेक्टोमार्टच्या 9 शाखा म्हणजे 18 कुटुंबियांना आधार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. या 9 शाखा केवळ 100 टक्के चांगला रिजल्ट दिल्याने होत आहेत, असे पद्मश्री गंगावणे यांनी सांगितले. संतोष नाईक यांनी गाव खेड्यातील जनतेला उत्कृष्ठ सेवा देण्यासाठी ही शाखा झाली असल्याचे सांगितले. टप्याटप्याने प्रगती करीत इथपर्यंत पोहोचलो तो सचोटी आणि ग्राहकानी दिलेल्या सेवामुळे आपण ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देत असून संपूर्ण जिल्ह्यात विस्तारलेली ऑप्टिकल्स ही आपण ग्रुपच्या माध्यमातून चालवतो, प्रामाणिक स्टाप हा माझ्या यशाचा भागीदार असल्याचे स्पेक्टोमार्टचे संचालक मंगेश चव्हाण यांनी सांगितले.