चिपळूण : कोळके वाडी धरण updates @10:30 AM

चिपळूण । प्रतिनिधी
सध्या वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५ः५० मी म्हणजेच इशारा पातळीवर आहे. कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी १३४.३५ मी. आहे. कोळकेवाडी धरणाच्या परिसरात काल सकाळी ८ पासून आज ८ पर्यंत म्हणजे २४ तासामध्ये २२० मिमी पाऊस पडलेला आहे. आज सकाळी ८ ते १०ः३० यावेळेत ६० मिमी पाऊस पडलेला आहे. सर्व मशीन बंद केलेल्या आहेत. सकाळी ९ः५० वा भरती होती आता दुपारी ३ः५० वा ओहोटी आहे. पुढील अर्धा तास महत्त्वाचा आहे. ११ ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलीस व NDRF यांची पथके ठेवण्यात आलेली आहेत. ५ ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे प्रशासनाने कळवले आहे.