मुंबई : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे आयोजित भव्य राखी प्रधान सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याने अभिमानास्पद यश मिळवत महाराष्ट्रभर ठसा उमटवला. २३ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्याने कोकण–ठाणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला, तर राज्यातील एकूण ८० संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. जिल्हा महिला मोर्चाच्या बळकट संघटनेने संपूर्ण जिल्ह्यात उत्साहात राखी संकलन मोहीम राबवली. यात रत्नागिरी शहराने विक्रमी संख्येने राख्या जमा करून आघाडी घेतली. तसेच अकरा मंडळातूनही चांगले संकलन झाले.
या यशाचे श्रेय जिल्ह्यातील प्रत्येक मंडळ अध्यक्ष, सर्व बुथ प्रमुख आणि महिला कार्यकर्त्यांना दिले गेले. अध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी जोशपूर्ण सहभाग नोंदवला. या मोहिमेत नुपूर मुळ्ये, श्रुती ताम्हणकर, शीतल रानडे, प्रभावती कानडे, अश्विनी वरवडेकर, रसिका देवळेकर, अनिता राजे शिर्के, जया केतकर, प्रियल जोशी, शितल दिंडे, वैष्णवी चव्हाण, स्नेहा चव्हाण, धृवी लाकडे, सारिका भावे, सुचिता ढेकणे, श्रद्धा इंदुलकर, रूपाली कदम, पल्लवी पाटील, सुप्रिया रसाळ, संपदा तळेकर, भक्ती दळी, रेणुका गुंडये अशा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मेहनत घेतली.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महिलांचे योगदान हेच खरी संघटनेची ताकद असल्याचे गौरवोद्गार काढले. महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी महिला उभी राहिली तर समाज उभा राहतो असे मार्गदर्शन केले.












