आचरा–अर्जुन बापर्डेकर
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचराचा ऐतिहासिक दसरोत्सव व शिवलग्न सोहळा गुरुवारी सायंकाळी अलोट गर्दीत आचरा वरची वाडी येथील फुरसाई मंदिराजवळ पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी सोनं लुटण्यासाठी आणि शिवलग्न सोहळ्यास भाविकांनी अलोट गर्दी केली होती. या सोहळ्यासाठी दुरदुरवरुन भाविकांची गर्दी उसळली होती.
दसऱ्यादिवशी सकाळ पासूनच माहेरवाशीणींनी फुरसाई मंदिराजवळ ओट्या भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या .सायंकाळी रामेश्वर मंदिराकडून श्रींच्या स्वारीसहीत देवाचे तरंग भाविकांच्या उपस्थितीत फुरसाई मंदिराजवळ आल्यावर सोनं लुटण्यासाठी उभ्या केलेल्या आपट्याची मानकरयांकरवी विधीवत पूजा केली गेली. त्यानंतर शिवलग्न सोहळ्यासोबत श्रींच्या भेटीनंतर बंदुकीच्या फैरी झाडून इशारा झाल्यावर सोनं लुटण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. यावेळी
देवस्थानचे वहिवाटदार मिराशी, देवस्थान समिती , मानकरी देवसेवक यांच्या सह ग्रामस्थांची गर्दी उसळली होती.
पावसाची उसंत
गेले काही दिवस सतावणा-या पावसाने दुपार पासून उसंत घेतल्याने दसरोत्सव सोहळ्यास भाविकांनी गर्दी केली होती.














