-
प्रशांत यादव यांची उपस्थिती
चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील तिवरे ग्रामविकास तरुण मंडळ, पुणे यांच्यातर्फे तिवरे शाळा नं. १ येथे विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तिवरे शाळेतील मुलांना रेनकोट वाटप कार्यक्रमाला वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी उपस्थिती राहून मुलांशी संवाद साधला. या शाळेच्या समस्यांबाबतही त्यांनी चर्चा केली. तिवरे ग्रामविकास मंडळ पुणे यांच्या कार्याचे कौतुकही केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विनोद शिंदे, सचिव अनंत शिंदे, खजिनदार मोहन शिंदे, मानकरी लक्ष्मनराव शिंदे, सल्लागार अनंत शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पेढांबकर, पांडुरंग (अण्णा) शिंदे, प्रकाश शिंदे, सुभाष शिंदे, यांच्यासह प्रशांत यादव यांचे सहकारी डॉ. सुनील सावंत, राहुल पवार आदी उपस्थित होते.











