चिपळूण (प्रतिनिधी) : शशिकांत नारायण पावसकर यांच्यामार्फत राकेश हरिश्चंद्र सावर्डेकर यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आंबडस, तालुका खेड या विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १२ वी च्या एकूण ५५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच शाळेसाठी इंग्रजी डिक्शनरी भेट देण्यात आली.
आंबडस विद्यालय हे उपक्रमशील विद्यालय आहे आणि येथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला जातो असे विद्यालयाचे कौतुक करत यापुढेही शाळेच्या भौतिक सुविधेसाठी नेहमीच सहकार्य लाभेल असे आश्वासन शशिकांत पावसकर यांनी दिले. विद्यालयातील शिक्षक गणेश सावर्डेकर यांनी यावेळी शशिकांत पावसकर व राकेश सावर्डेकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत विद्यालयातर्फे आभार मानले. याप्रसंगी विद्यालयाचे चेअरमन अशोक निर्मळ, मुख्याध्यापक विलास चोरगे, शिक्षक महेश कुलकर्णी, राजेंद्र बांबाडे, अनघा राजेशिर्के, कृष्णकांत कुंभार, संगिता चौगुले, प्रज्ञा जठार, रुपेश धाडवे, सिद्धेश पाटील आदी उपस्थित होते.












