करुळ भोयडेवाडी येथील वीज वितरण डीपी व थ्री फेज लाईनचे उद्घाटन 

पालकमंत्री नितेश राणे यांची वचनपूर्ती : ग्रामस्थांनी मानले आभार 

वैभववाडी l प्रतिनिधी :     करूळ भोयडेवाडी येथील वीज वितरण डीपी (रोहीत्र) व थ्री फेज लाईनचे उद्घाटन भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या हस्ते पार पडले. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून या कामासाठी निधी मंजूर झाला होता. काम पुर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांनी नामदार नितेश राणे यांचे आभार मानले.

भोयडेवाडी डीपी नसल्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणी भेडसावत होत्या. गणेश चतुर्थी सणामध्ये कमी भारमानामुळे उपकरणे बंद पडत होती. डीपी व थ्री फेज लाईन चे काम मार्गी लागावे यासाठी ग्रामपंचायत व वाडीतील ग्रामस्थ यांनी नामदार नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. सदर काम लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले होते. सदर काम गणेश चतुर्थीपुर्वी पुर्ण झाले आहे. तसेच वि. मं. करुळ भोयडेवाडी छप्पर दुरुस्तीचे काम ही मार्गी लागले आहे.

या डीपी चे उद्घाटन नुकतेच पार पडले. यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, भाजपा शक्ति केंद्रप्रमुख प्रकाश सावंत, माजी सरपंच हिंदुराव पाटील, उपसरपंच सचिन कोलते, सुर्यकांत माळकर, हेमंत पाटील, संतोष सावंत, अशोक टक्के, संदीप माळकर, सचिन माळकर, रमेश टक्के, प्रकाश जामदार, रामचंद्र गुरव, वायरमन शाम गायकवाड व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.