दापोली :– दापोली तालुक्यातील जालगाव येथील डॉक्टर प्रशांत परांजपे यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने पर्यावरण पूरक असा गणेशोत्सव गेली अनेक वर्ष साजरा केला जातो. ते स्वतःच शेतातील लाल मातीपासून गणेशाची मूर्ती बनवतात. दीड दिवसाच्या गणेशोत्सवा मधून प्रतिवर्षी विविध संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
यावर्षी पुनरावर्तन त्या संकल्पनेला अधोरेखित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्ष परांजपे यांच्याकडे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला जातो.गणेशोत्सवाच्या विसर्जन प्रसंगी पर्यावरण पूरक मूर्तीचे घरच्या घरीच केलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन केले जाते. यानंतर दोन दिवसानंतर विसर्जित मूर्ती ही पाण्यामध्ये पूर्णतः विरघळलेली असते पाणी काढून टाकल्यानंतर उरलेली लाल माती ही परिसरातील झाडांना घातली जाते .किंवा एखाद्या कुंडीमध्ये ठेवून त्याच्यामध्ये एखादे रोपट लावलं जातं .अशा पद्धतीने बाप्पा ३६५ दिवस आपल्या परिसरात राहतो अशा भावनेतून आणि निसर्गाने दिलं आहे ते निसर्गाला मिळणं आवश्यक आहे. तरच निसर्गचक्र पूर्ण होतं . यावर्षी विसर्जित केलेल्या मूर्तीची पुढील वर्षी पुन्हा याच शेतातील लाल मातीतून श्री गणेशाच्या मूर्तीची निर्मिती करून त्याची प्रतिष्ठापना केली जाते. यालाच पुनरावर्तन असं म्हटलं जातं .
दिवसेंदिवस निसर्ग कोपतो आहे .पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. आणि म्हणूनच सर्वांनीच निसर्गाचे लचके तोडणे थांबवले पाहिजेत. बाप्पाकडे सर्वांनीच पुनरावर्तन संकल्पनेचा अंगीकार करण्याचे मागणं यावर्षी पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रशांत परांजपे यांनी केले आहे.












