पार्थ मेस्त्रीने रांगोळीतून साकारली कलाकृती

विजयदुर्ग ( प्रतिनिधी ) मालवण येथील भंडारी हायस्कूल मध्ये इयत्ता १०वीत शिकणारा कु. पार्थ साईनाथ मेस्त्री याने आषाढी एकादशीचे औचित्य साधून तीन बाय दीड सेंमी. आकाराच्या तुळशीच्या पानावर सुंदर, आकर्षक रांगोळी रेखाटली आहे. हा प्रयोग त्याने अवघ्या अठरा मिनिटात साकारला आहे. यापूर्वीही त्याने रांगोळी व चित्रकलेच्या माध्यमातून अनेक प्रयोग केले असून लहान वयातच अनेक कार्यक्रमामध्ये त्याला आमंत्रित केले जाते. दरम्यान, त्याने हा रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या अधिकृत वेबसाईटवर पाठविला असून या आगळ्यावेगळ्या प्रयोगामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.












