रत्नागिरी जिल्ह्यातील 24 तासातील पाऊस

रत्नागिरी :

रत्नागिरी जिल्ह्यात आज, ८ सप्टेंबर २०२५ रोजी एकूण १३३.७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचा सरासरी पाऊस १४.८५ मिमी इतका आहे.

आज जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात (५४.५० मिमी) झाला, तर त्याखालोखाल दापोली (३१.२८ मिमी) आणि खेड (१६.०० मिमी) येथे चांगला पाऊस झाला.

चिपळूण (१०.५६ मिमी) आणि गुहागर (१०.४० मिमी) येथेही पावसाची नोंद झाली. मात्र, संगमेश्वर (१.१६ मिमी), लांजा (२.२० मिमी) आणि राजापूर (३.६२ मिमी) या तालुक्यांमध्ये पाऊस कमी होता. रत्नागिरी शहरात आज ४.०० मिमी पाऊस पडला.