सन २०००–०१ एसएससी बॅचचा स्नेहमेळावा, शाळेसाठी स्नेहदान
शिरगाव (प्रतिनिधी) – देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सन २०००–०१ एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना, माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या वर्ग नूतनीकरणासाठी १ लाख ५१ हजार रुपयांची देणगी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष स्व. पुंडलिक कर्ले साहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर सरस्वती पूजन व शाळेतील शिक्षकांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थाध्यक्ष अरुणभाई कर्ले, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, अधीक्षक संदीप साटम, कार्यकारिणी सदस्य अमित साटम, प्रकाश गोठणकर, माजी शिक्षक विजय वळंजू, आचरेकर, व्ही. डी. लब्दे, डी. एम. डावरी, दिलीप पाळेकर आणि मुख्याध्यापक एस. एन. आत्तार सर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. बाळकृष्ण लोके, प्रा. सुहास खरात, आशीर्वाद कुबडे, रिझवान खान, शरद परब, धीरज वळंजू, स्वप्नील कदम, अपर्णा घाडी, अनिता लब्दे, जितेंद्र सावंत, पौर्णिमा पेडणेकर, योजना इंदप आणि इतर माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.
मुख्याध्यापक एस. एन. आत्तार सरांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानून त्यांच्या योगदानाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. संस्थाध्यक्ष अरुणभाई कर्ले यांनी या पुढाकाराचे कौतुक करत तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त केले.












