- रत्नागिरी: गणेशोत्सवाच्या काळात ‘गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी विभाग’ द्वारे गडकिल्ले संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी एक प्रभावी पोस्टर मोहीम राबवण्यात आली. मागील वर्षाप्रमाणेच या उपक्रमाला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या मोहिमेमुळे हजारो भाविकांपर्यंत आप
ला संदेश पोहोचला आणि गडकिल्ल्यांच्या जतनाविषयी जनमानसात जागरूकता निर्माण झाली.
या मोहिमेचा मुख्य संदेश, “गड जिंकायला तर हातभार लावू नाही शकलो, पण गड जपायला नक्की हातभार लावू शकतो..!!” हा अनेकांना भावला. तसेच, “गडकिल्ले आपले वारसा – त्यांचे संवर्धन आपली जबाबदारी!” हे घोषवाक्यही पोस्टर्सवर झळकले.
‘गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान’ने सांगितले की ही मोहीम केवळ जनजागृतीपुरती मर्यादित नसून, पुढील पिढ्यांसाठी आपला इतिहास जपण्याचा एक संकल्प आहे. या मोहिमेच्या यशामुळे महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या जतनासाठी लोकांमध्ये वाढत असलेली आवड आणि सक्रिय सहभाग दिसून येतो.












