बांदा तेलीआळी ते पोलीस स्टेशन रस्त्यासाठी निधी मंजूर

बांदा भाजपतर्फे पालकमंत्र्यांचे आभार

बांदा l प्रतिनिधी :राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्यातर्फे नागरी सुविधा अंतर्गत बांदा तेली तिठा ते पोलीस स्टेशन दरम्यानच्या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी २.५० लाख रुपये मंजूर केले आहेत. याबाबतची माहिती भाजप शहराध्यक्ष बाबा काणेकर यांनी दिली.

 

सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. सदर रस्ता डांबरीकरण करण्याची स्थानिकांची मागणी होती. बांदा शहर भाजप कडून निधीसाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर या रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याने या भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. बांदा शहर भाजपा तर्फे पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.

——