रत्नागिरी ः प्रतिनिधी
शिवाजी नगर एसटी स्टॉप येथून साळवी स्टॉपच्या दिशेने जाताना अचानकपणे थांबलेल्या दुचाकीवर मागून येणारी दुचाकी आदळून अपघात झाला. अपघाताची ही घटना शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वा.सुमारास घडली असून यात एकाला दुखापत झाली आहे.
पवन अमित साळुंखे (20,रा.जुनी तांबटआळी,रत्नागिरी) असे अपघातातील जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी पवन साळुंखे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-बीजी-6244) वरुन जयस्तंभ ते टीआरपी असा जात होता. त्याच सुमारास त्याच्या पुढील दुचाकी चालक आपल्या दुचाकीवर एकाला मागे बसवून त्याच्या खांद्यावरुन अॅल्युमिनियमच्या पट्टया घेउन जात होता. तो शिवाजीनगर एसटीस्टॉप ते साळवी स्टॉप असा जात असताना अचाकपणे थांबला. त्यामुळे मागून येणार्या पवनच्या दुचाकीची त्यांना धडक बसली. यात त्या अॅल्युमिनियमच्या पट्टया पवन साळुंखेच्या तोंडाला लागल्यामुळे तो जमखी झाला. पवनवर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत












