राजापूर (वार्ताहर): जागतिक बांबू दिनानिमित्त राजापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुप व महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सौंदळ येथे वासुदेव घाग यांच्या बांबू शेतात शेतकरी मेळावा घेण्यात आला.
या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यासाठी पं,. स. कृषी विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे, मंडळ कृषी अधिकारी पाचल अनंत भारती, सहाय्यक कृषी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, विस्तार अधिकारी प्रथमेश पाटील आणि प्रमुख मार्गदर्शक बांबू अभ्यासक पाटलोबा पाटील व पितांबरी प्रायव्हेट लिमिटेडचे ऍग्रो एक्झिकेटिव्ह कुंजन साळवी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी बांबू लागवड कशी उपयुक्त ठरणार आहे. बांबू हे शाश्वत उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे असे आव्हान केले.
त्यासाठी शासन राबवत असलेल्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली. पडीक जमिनीवर सामूहिक पद्धतीने बांबू लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात बांबू लागवड होऊ शकते व त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. बांबूवर आधारित छोटे मोठे उद्योगधंदे निर्माण होऊ शकतात व स्थानिक बाजारपेठ निर्माण होऊ शकते. त्यामुळे बांबू हे शेतकऱ्यांसाठी हिरव सोन आहे त्याची जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड करावी असे मत मांडण्यात आले.
राजापूर तालुक्यामध्ये माणगा व भोरबेट या स्थानिक बांबू जातींची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या बांबूला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून याच ठिकाणी विक्री व्यवस्थापन केल्यास चांगला फायदा होऊ शकतो त्यासाठी लागणारी मदत आणि मार्गदर्शन मी वेळोवेळी करत राहीन असे पाठलोबा पाटील यांनी सांगितले.
यावेळी सौन्दळ उप सरपंच खानबाबा, कोळवण खडी गावाचे सरपंच प्रवीण रहाटे, सौन्दळ, पोलीस पाटील, सौ.समृद्धी पाटील, अनिल माळी, वासुदेव घाग, नामदेव घाणेकर, डॉ.मुकरी, शिवाजी मोरे, पांडुरंग गुरव, सुनील गुरव,अरुण मोरे, अशोक गुरव, किशोर लाड, हरिचंद्र मोरे, अब्दुलगणी लांजेकर,सदाशिव सरखोत, रोहित यादव, मनोहर पवार, योगेश चोरगे, अब्बास गोलंदाज, रमेश दळवी राहुल सावंत, नजीर गुडेकर, दिलीप जाधव ( पितांबरी समुहाचे जनसंपर्क अधिकारी) तसेच राजापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुपचे सदस्य, सौन्दळ परिसरातील बांबू शेतकरी आणि महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन मुंबई, फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीराज, प्रल्हाद नारकर, नागेश बने, प्रतीक गुरव, निलेश कुर्ले, मितेश मोरे, सुधाकर गुरव उपस्थित होते. आभार सुहास मोरे यांनी मानले.












